Prarthana Beheres upcoming movie ‘Anaan’
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध प्रयोग सुरु आहेत. इतर चित्रपटसृष्टीतील मंडळी मराठी चित्रपटांकडे आकर्षित झाल्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला नवीन प्रयोग पाहायला मिळणार हे नक्की. रोहन थिएटर्स ही सिनेसंस्था लवकरच एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘अनान’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचे टीझर पोस्टर डिजीटली लाँच करण्यात आलं. विशेष मन्हजे लाँच नांतर अवघ्या दोन दिवसांत या टीझर पोस्टरला एक लाख व्ह्यूज प्राप्त झाले.
या चित्रपटात प्रार्थना बेहरे एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या टीझर पोस्टर मध्ये ‘नटराज’ च्या मूर्तीसमोर उभी असलेली एक जोडी आपल्याला दिसते या पैकी एक प्रार्थना असून ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तिअसलेला नायक मात्र अद्याप समोर आलेला नाही. या पोस्टरवर स्वर्णाक्षरात लिहिलेलं ‘अनान’ हे चित्रशीर्षक… या शब्दाचा अर्थ नेमका काय? हे आजून स्पष्ट झालेले नाही . तसेच या चित्रपटातून नेमका कोणता विषय प्रेक्षकांसमोर येणार तसेच प्रार्थनाच्या जोडीला अजून कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार या विषयी सध्या माहिती देण्यात आलेली नाही.
‘अनान’ या चित्रपटातून ‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया निर्माते म्हणून मराठीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची कथा हेमंत भाटीया यांनी लिहिले असून चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलं आहे . या चित्रपटाची पटकथा – संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शनाबरोबरच गीतलेखनाची बाजू राजेश कुष्टे यांनी पेलली आहे.‘अनान’ या चित्रपटाच्यानिमित्ताने सौरभ– दुर्गेश ही संगीतकार जोडीही मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे.