Prarthana Behere shares special moments before her wedding

 

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असतो. मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सध्या ती लग्नाच्या तयारीत बिझी झाली आहे अश्यावेळीही ती तिच्या मनातील भावना तिच्या फॅन्स पर्यंत पोहोचवते आहे. प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिने लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी वेळोवेळी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवल्या.

 

Prarthana Behere pre-wedding 03

 

प्रार्थनाने ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते.प्रार्थनाने हि भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

Prarthana Behere pre-wedding 04

 

तिच्या सोशल मीडिया अकॉउंट वर #gettingmarriedsoon असं लिहून तिने तिचे काही खास फोटो शेअर केले आहे. तिच्या फॅन्स ने तिला या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक अभिषेक जावकर सह 14 नोव्हेंबर 2017 ती लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाला आता खूप कमी दिवस उरले आहेत.

 

Prarthana Behere pre-wedding 05

लग्नानंतर सुरु होणाऱ्या नवीन प्रवाससाठी ती खूप उत्सुकही आहे. प्रार्थनाचे व अभिषेक यांचे अरेंज मॅरेज असून ऑगस्टमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. ते गोव्यात डेस्टीनेशन वेडींग करणार आहेत. प्रार्थनाच्या लग्नासाठी तिच्या चित्रपटसृष्टीतील मित्र मैत्रिणींनीही जोरदार तयारी करत आहेत .अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.