Prarthana Behere to get married to director Abhishek Jawkar

Prathana Behere Marriage 03

मराठी चित्रपटातील कलाकारांनी लव्ह मॅरेज केले तर काहींनी पल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीप्रमाणे अरेन्ज मॅरेज केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच अभिनेत्री प्रार्थना बेहरे विवाह बंधनात अडकणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक जावकरसह 14 नोव्हेंबर 2017 ती लग्नबंधनात अडकणार आहे.येत्या ऑगस्टमध्ये प्रार्थनाचा साखरपुडा होणार आहे. हे डेस्टीनेशन वेडींग असल्यामुळे सध्या हे दोघे चांगल्या लोकेशनच्या शोधात आहेत. या लग्नाबाबत आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांची ओळख एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने झाली व त्यानंतर हे लग्न ठरले. प्रार्थनाचे लग्न अरेंज मॅरेज असून या दोघांमधील ब-याच गोष्टी आवडी निवडी एकसारख्या आहेत.

 

Prathana Behere Marriage 02

 

पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेतून अंकिता लोखंडेच्या लहान बहिणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी प्रार्थना बेहेरे नंतर मराठी चित्रपटांमध्ये रुळली. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मि. अँड मिसेस सदाचारी, बायकर्स अड्डा या चित्रपटांतून नायिकेच्या भूमिकांमधून ती दिसली. या वर्षीच्या सुरुवातीला तिचा ‘फुगे’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु, याआधीच्या तिच्या ‘कॉफी आणि बरंच काही’ मधून तिनं प्रेक्षकांची खूप वाहवाही मिळवली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. आता आपल्या आयुष्याच्या जोडीदारसह या वैयक्तीक आयुष्य आणि रिल लाइफ आणखी खुलावे याच शुभेच्छा.

 

Prathana Behere Marriage 01

 

अभिषेकने बनवलेला ‘मिसिंग ऑन अ विकेंड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या चित्रपटासाठी सेन्सॉरने ५१ कट्स सुचवले होते पण आता ५ कट्सवर दोघांचं एकमत झालंय. प्रार्थनाचा ‘व्हाट्सअप लग्न’ चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. तिच्या फॅन्ससाठी सुखद बातमी ही आहे की ती लग्नानंतरही चित्रपटांतून काम करीत राहणार आहे.

प्रार्थना आणि अभिषेकला सिनेमाझा काढून खूप साऱ्या शुभेच्छा.