Mukta Barve soon to be seen on small screen with this upcoming serial

Mukta Barve for Rudram 02

 

अभिनेत्री मुक्ता बर्वे हि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतंच प्रदर्शित झालेला त्यांच्या चित्रपट हृदयांतर यांतील त्यांच्या भूमिकेचा विशेष कौतुक करण्यात आलं होतं. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची लवकरच छोट्या पडद्यावर ‘रुद्रम’ नावाची अप्रतिम थरारक मलिक प्रेक्षकांनच्या भेटीसाठी येत आहे. एखाद्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होते. आणि त्यानंतर ती तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा लढा कश्याप्रकारे देते यावर आधारित हि मालिका आहे. ‘रुद्रम’ हि त्या स्त्रीच्या प्रतिशोधाची नवीन मालिका लवकरच झी युवा वाहिनीवर सुरु होणार आहे.

 

‘रुद्रम’ या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. मालिका अतिशय वेगवान असून ठराविक भागांमध्ये संपुष्ट होणारी आहे. या मालिकेचा विषय गुतागुंतीचा असूनही तो अतिशय सोप्या रूपात मांडला आहे आणि या मालिकेची सर्वात जमेची बाजू म्हणजे मुक्ता बर्वे.अभिनेत्री मुक्ता बर्वेने या आधी हि छोट्या पाड्यावर उत्कृष्ट काम केले असून या मालिकेतील तिने साकारलेली व्यक्तिरेखा तमाम रसिकांना नक्कीच आवडेल.

 

झी युवावर ७ ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रुद्रम हि मालिका प्रदर्शित होणार आहे. ‘रुद्रम’ या मालिकेत मुक्ता सोबत वंदना गुप्ते , सतीश राजवाडे , मोहन आगाशे , संदीप पाठक , किरण करमरकर , मिताली जगताप , सुहास पळशीकर विवेक लागू , सुहास सिरसाट , सई रानडे , अनिरुद्ध जोशी , मिलिंद फाटक , सुनील अभ्यंकर , आनंद अलकुंटे , किरण खोजे , आशिष कुलकर्णी या आणि अशा उत्तमत्तोम नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत. गिरीश जोशी यांनी या मालिकेचं लेखन केलं असून भीमराव मुडे यांनी दिग्दर्शन केले आहे.