Mukta Barve soon to be Radio Jockey….

Mukta Radio show 01

भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.‘स्त्री’ या शब्दात आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध भावनिक स्वरूप आहे !! आजच्या बदलत्या समाजात ‘स्त्री’ चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश आहे.स्त्रीयांच्या या बदलत्या विश्वाचा वेध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार.

मराठी मधील सुपरस्टार अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.हा कार्यक्रम स्त्री विकासावर आधारित असणार आहे . आपल्या अभिनयाच्या कौशल्याने तिने नेहेमीच प्रेक्षकांची माने जिंकली आहेत .

लवकरच मुक्ता बर्वे रेडिओ जॉकीच्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे. माय एफ एम रेडिओ वाहिनीमार्फत पहिल्यांदाच जनजागृतीपर कार्यक्रम एका सेलिब्रिटीद्वारे सादर केला जाणार आहे . मुक्ताच्या आवाजातला हा शो दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ वाजता पश्चिम महाराष्ट्रात सुरु होत आहे.
माय एफएमला या चॅनेल प्रमाणे मुक्ता बर्वे या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेतील अशी त्यांची खात्री आहे.

या आगळावेगळा उपक्रमामध्ये स्त्री विकासाचे अनेक पैलू मांडले जाणार आहेत. एफएम सादर होणाऱ्या या विशेष उपक्रमा मधे गंभीर आणि सामाजिक विषय हाताळे जाणार आहेत.

मुक्त बर्वे यांनी केलेल्या चित्रपटातून भरगोस यश मिळवले आहेत, त्यामधून केलेल्या भूमिकेतून स्त्री विषयपर अनेक समस्यांना तिने सादर केल्या आहेत .
मुक्त बर्वे या कारेक्रमा मार्फत प्रथमच एमएमच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधणार आहे. स्त्री मानसिकतेचा वेध घेण्यासाठी होणार हा विशेष कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते नक्कीच आतुर असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.