Mukta Barve experienced motherhood due to this movie

Mukta Barve Hrudayantar 03

अभिनेत्री मुक्ता बर्वे हीच आगामी चित्रपट ‘हृदयांतर’ या मध्ये ती आई ची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत तिने तिच्या अभिनय कौशल्याने अनेक चित्रपट व नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सशक्त अभुनयामुळे तिने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केले आहे.
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ या चित्रपटामध्ये आपण तिला सुबोध भावे या अष्टपैलू कलाकारांबरोबर पाहणार आहोत. या चित्रपटामध्ये ती समायरा जोशीच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करत आहे.

 

Mukta Barve Hrudayantar 01

जागतिक मातृदिनाच्या दिवशी ‘हृदयांतर’ चित्रपटाचा एक नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. मुक्ता आणि तिच्या या चित्रपटातील दोन मुली या पोस्टरमध्ये आपल्याला दिसतील. याच बरोबर असे लिहिले आहे कि ,”तिचे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मोल नाही “. या पोस्टर मध्ये मुक्ता आणि तिच्या या चित्रपटातील दोन मुलीने पाउट केला आहे यावरून आई मुलीची जिवाभावाची मैत्री असल्याचं समजते.

 

 

चित्रपटातील भूमिके विषयी सांगताना म्हणाली की तिने या आधी ‘वायझेड’ चित्रपटात आई ची भूमिका केली होती पण ती अगदी पाच मिनिटांचीच भूमिका होती ज्यामध्ये तिला आईपणाची अनुभूती आली न्हवती परंतु ‘हृदयांतर’ या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी मिळाली. तिच्या आईने आजपर्यंत तिच्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव तिला या भूमिकेमुळे झाली.

Mukta Barve Hrudayantar 02

मुक्ताची आई हि मुक्ताची खरी समीक्षक आहे त्यामुळे मुक्ताला तिने साकारलेल्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया तिच्या आई कडून जाणून घ्यायची उत्सुकता होती.
ज्यावेळी विक्रमने तिच्या आईला चित्रपटाचा फर्स्ट कट दाखवला तेव्हा ती पाच मिनिटं काहीच बोलली नाही. त्यानंतर ती विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या चित्रपटाने मी नि:शब्द झाले. मुक्ताच्या आईच्या या प्रतिक्रियेमुळे तिला आत्मविश्वास मिळाला आणि तिने केलेली भूमिका तिच्या आई ला आवडली याची तिला खात्री पटली.

 

 

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ हा चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.