Mithila Palkar to share screen with Dulquer Salmaan and Irrfan khan

Mithila Palkar in Hindi Movie 01

 

आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेली आणि त्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली इंटरनेट सेन्सेशन मिथीला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिने भरपूर काम केले आहे. गर्ल इन दि सिटी, लिटिल थिंग्स यांसारख्या युथ ओरिएंण्टेड प्रोजेक्टमधून तिने सर्वांचे मनोरंजन केले आहे. मिथिलाने या आधीही हिंदी चित्रपटात भूमिका साकारली आहे परंतु या आगामी चित्रपटात ती विशेष आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे ती या आगामी हिंदी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते इरफान खान आणि मल्याळम अभिनेता डलक्यूअर सलमान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

 

 

मिथीलासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.या चित्रपटाच्या माध्यमाने मल्याळम सिनेमांमधील सुपरस्टार डलक्यूअर सलमान हा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. नामवंत अभिनेता इरफान खान यात असल्याने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात मराठमोळ्या मिथीलाला काय भूमिका असणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. अद्याप या चित्रपटाचे टायटल ठरलेलं नसून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आकर्ष खुराणा हा करणार आहेत . या चित्रपटाची कथा हुसेन दलाल यांची असून या आधी त्यांनी ‘ये जवानी है दिवानी’, ‘२ स्टेट्स’ सारख्या सिनेमांचं लेखन केलं आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यंत या सिनेमाचं काम सुरू होणार आहे.