Mitali Mayekar exited to be a part of Pinkathon

Mitali Pinkathon 02

अभिनेत्री मिताली मयेकर हे नाव उर्फी या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना अवगत झाले आहे. ‘उर्फी’ या चित्रपटामध्ये मितालीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. याचप्रमाणे फ्रेशर्स या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मिताली मयेकर हिने फार कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने चांगलीच प्रसिद्धी प्राप्त केली आहे.

मिताली मयेकर हे नाव आता मराठी मालिका आणि चित्रपट विश्वामध्ये चांगलेच गाजत आहे. आतापर्यंत मिताली ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती पण आता ती ठाणेकरांना पिंकथॉनच्या माध्यमातून भेटणार आहे. महिलांचे सशक्तीकरणाचा उद्देश असलेल्या पिंकथॉन मध्ये बेधडक आणि बिंधास मिताली मयेकर युथचे प्रतिनिधित्व करणार आहे. १९ मार्च रोजी बाळकूम ठाणे येथे पिंकथॉनच आयोजन करण्यात आले आहे . ठाणे येथील पिंकथॉन मध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी या दिग्गजांसोबत मिताली सहभागी होणार आहे.

मिताली तिच्या या आगामी उपक्रमासाठी फार उत्सुक आहे. नुकताच तिने मिलिंद सोमण आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचे फोटो तिच्या सोशल अकाऊंट वर शेअर केले आहेत. ठाणेकरांनी या पिंकथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन तिने केले आहे.

मितालीने आजच्या युथवर एक प्रकारची मोहिनीच घातली आहे. टेलव्हिजन मालिकांच्या विश्वात झी युवा या वाहिनी ने युवा प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे . या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या विविध मालिकांनी अनेक नव्याकलाकारांना ओळख दिली आहे.‘फ्रेशर्स’ या मालिकेतील ‘सायली’ ही भूमिका साकारत मिताली मयेकर हिने सगळ्याच युथवर मोहिनीच घातली आहे. आज प्रत्येक तरुणाचे स्वप्न म्हणजे आपली प्रेयसी सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी व तिच्याबरोबर आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत .यापूर्वी मिताली मयेकर हिला तू माझा सांगती, असंभव, उंच माझा झोका अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून आपण पहिले आहे. तिच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसें दिवस वाढत आहे. तर यावेळी आपण तिला वेगळया अंदाजात १९ मार्चला पाहणार आहोत.

विविध मालिका, चित्रपट आणि आता पिंकथॉनच्या निमित्ताने मिताली शक्य त्या सर्व परिंनी या क्षेत्रामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे . पिंकथॉन मध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत या उपक्रमात सहभागी होताना तिला फारच आनंद होत आहे हे नक्की .

Leave a Reply

Your email address will not be published.