Manasi Naik’s upcoming Item song

Manasi Naik New song 01
काही दिवसांपुवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटावर बंद जाहीर केली. या नोटा बंदि नंतर जुन्या नोटा बंद करून नविन नोटा चलणात आणण्यात आल्या. या नोटा बंदीनंतर 2000 रूपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली. गुलाबी रंगाची ही 2000ची नोट अतिशय आकर्षक बनवण्यात आली आहे.

Manasi Naik New song 02

‘प्रेमा’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या गाण्यावर मानसी नाईक बहारदार नृत्य करताना दिसणार आहेत. मानसी नाईक 2000 ची नोट बनून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील गुलाबी नोट मानसी नाईक या आयटम नंबर वर प्रेक्षकांना नाचायला भाग पडणार आहे. या गाण्याचे शूटींग नुकतंच करण्यात आले. मानसी नाईक चे बहारदार नृत्य व मानमहोक अदा या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Manasi Naik New song 03

मार्कंडेय फिल्म प्रस्तुत,रमेश गुर्रम निर्मित आणि सदानंद इप्पकायल दिग्दर्शित ‘प्रेमा’ या आगामी चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहीली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि रेश्मा सोनावणे यांनी गाणी गायली असून नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै यांनी केले आहे. नयन निरवळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

Manasi Naik New song 04

चलनातील दोन हजाराची नोट लोकांनी जशी स्वीकारली तशीच चंदेरी पडद्यावरची ही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीम ने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.