Madhuri Dixit and Renuka Shahane soon to be seen together in a Marathi Film

Madhuri and Renuka in marathi movie 01

‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटातील निशा आणि पूजा आठवतात का तुम्हाला. या दोघीनी त्यांच्या स्मित हास्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. या दोन मराठमोळ्या अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. या दोघी अर्थात माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या एकत्र झळकणार आहेत आणि ते देखील मराठी चित्रपटातून. तब्बल 23 वर्षां नंतर या दोघी एकत्र काम करणार आहेत. ‘हम आपके है कौन ‘ या चित्रपटात या दोघीनी सख्ख्या बहिणी साकारल्या होत्या. विशेष म्हणेज हा अभिनेत्री माधुरी दीक्षित चा पहिला चित्रपट आहे. या आगामी चित्रपटाची माहिती रेणुका शहाणे यांनी त्यांचा ट्विटर अकॉउंट वर दिली.

 

Madhuri and Renuka in marathi movie 02

 

या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस विजय देवस्कर करणार आहे. माधुरीला मराठी चित्रपटात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या चाहत्यांना लागून राहीली आहे.या चित्रपटामुळे तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आणि पुन्हा एकदा माधुरीसोबत काम करायला मिळणार या गोष्टीमुळे रेणुकासुद्धा उत्सुक आहे. या विषयी अधिक माहिती देताना अभिनेत्री रेणुका म्हणाल्या ‘काही वर्षांपूर्वी तेजस आणि माझी एका माहितीपटाच्या निमित्ताने भेट झालेली. पण काही कारणाने त्यावर पुढे काही काम झालं नाही. पण तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. अचानक एक दिवस तेजस हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आला. यामध्ये माधुरी मुख्य भूमिका साकारणार असल्याचं त्याने सांगितलं. तिने मराठी चित्रपटात काम करावं ही खूप दिवसांपासूनची माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचा विषयसुद्धा आवडल्याने मी लगेच होकार दिला,’.

 

माधुरीविषयी सांगताना त्यांनी पुढे सांगितले कि त्या दोघींची पार्श्वभूमी सारखीच आहे. जेव्हा माधुरी ची आई सेटवर यायची तेव्हा त्या तिघी मराठीमध्येच गप्पा मारायचो. माधुरी दीक्षित हि इतकी मोठी अभिनेत्री असूनही तिला या गोष्टीतच अजिबात त्याचा गर्व नाही.माधुरीविषयी भावना व्यक्त करत पुढे ती म्हणाली “मी नेहमी म्हणते की, तुम्हाला माधुरीसोबत काम कराण्याची संधी मिळाल्यास, ही संधी दिल्याबद्दल तुम्ही निर्मात्यालाच पैसे देऊ केले पाहिजेत.”