Kranti Redkar will play the role of a police officer in upcoming movie

Kranti Redkar new movie Rocky 02

 

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने भरपूर मेहनत घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जत्रा, माझा नवरा तुझी बायको, शहाणपण देगा देवा, खो खो, फक्त लढ म्हणा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. तिने केलेल्या प्रत्येक भूमिकेतुन ती लोकप्रियता मिळवत गेली. उत्तम अभिनायानंतर तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. तिने दिग्दर्शत केलेल्या काकण या चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चांगलेच कौतुक केले. लवकरच ती प्रेक्षकांना रॉकी या चित्रपटात दिसणार आहे.

 

क्रांती रेडकरला रॉकी या चित्रपटात आपण एक वेगळीच भूमिकेत पाहणार आहोत. रॉकी या चित्रपटात ती पोलिसांच्या भूमिकेत झळकणार असून कल्पना ढोबळे असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ती या चित्रपटात पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या या वेगळ्या भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक असल्याचे ती सांगते. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता राहुल देवची देखील प्रमुख भूमिका आहे.

 

अभिनेता राहुल देव यांचा रॉकी हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. राहुल देव यांना याआधी अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपण पहिले आहे. काही दिवसं पूर्वी ते दिल बोले ऑबेरॉय या मालिकेतही झळकला होता.‘रॉकी’ हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट असून तो प्रेक्षकांना नक्की आवडणार अशी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खात्री आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खानच्या हस्ते झाला. या वेळी बोलताना ते म्हणाले कि हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल हे नक्की. तसेच त्यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत.त्याचा प्रमाणे या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत हे कलाकारां या चित्रपटात मुख्य भूमिका करणार आहेत.