Do you know the love story of Mayuri Wagh and Piyush Ranade

पीयूष रानडे आणि मयूरी वाघ यांची भेट झाली ‘अस्मिता’ या मालिकेच्या वेळी. या मालीकेत त्यांनी नवरा-बायको ही भूमिका साकारली. हि मालिका करताना या दोघांची खूप चांगली मैत्री झाली. त्यात एक वेळी अशी आली जेव्हा पीयूष एका सिनेमाच्या शूटसाठी १० दिवस बाहेर गेला होता. तो नसताना तिला सेटवर सतत त्याची आठवण यायची. या वेळी तिला काळूनचुकेल कि त्याचे नातं मैत्रीपलीकडचं आहे. आणि विशेष म्हणजे हीच गोष्ट पियुषला सुद्धा जाणवली.

Piyush and Mayuri 01

आपलं नातं मैत्रीपलीकडचं आहे आहे या दोघांना वाटले आणि पुढे काय याचा विचार करायला त्यानी सुरवात केली. त्यांनी या नात्याबद्दल अतिशय लक्षपूर्वक विचार सुरु केला. आणि एक क्षणी दोघांनाही लग्न करावं असं वाटू लागलं. यानंतर ते एकमेकांशी त्याबद्दल बोललो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मयुरी चे काम खूप चांगले चाले होते आणि या वेळी लग्न हा निर्णय तिला घ्याचा होता. अनके तारका ‘मला अजिबात लग्न करायचं नाही’ अश्या मताच्या असतात, पण मयुरी चे अजिबातच तसे म्हणणे नव्हतं. योग्य जोडीदार मिळाला की लग्न करायचं हे पक्कं होतं.

 

Piyush and Mayuri 02

 

पीयूषमध्ये तिला तिचा योग्य जोडीदार दिसू लागला. त्यांची मैत्री आधीपासूनच खूप चांगली होती. ती त्यांच्या लग्नानंतर हि तशीच टिकून आहे. हे दोघे मुंबईत राहतात. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत हे खरं पण सगळं काही सुरळीत आहे त्याचं कारण आहे त्याची आजही असलेली मैत्री . मयुरी सांगते कि त्यांच्यात भांडणं होतात, वाद होतात, मतभेदही आहेत; पण त्यानी एक गोष्ट ठरवली आहे की, भांडण झालं, की ते दुसऱ्या दिवशी उकरून काढायचं नाही. ते तिथेच संपवायचं. हि गोष्ट ते आजवर पाळत आहेत. लग्नानंतरचे सगळे पहिले सण माहेर आणि सासरकडच्या मंडळीने मोठ्या उत्साहात साजरा केले. आज २ फेब्रुवारीला यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या पुढील सुखी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!