Julie-2 fame Raai Laxmi eager to work in Marathi Films

Rai Laxmi 02

 

‘ज्युली 2’ या चित्रपटात प्रेक्षकांना बोल्ड अभिनेत्री व राय लक्ष्मी पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २००८ च्या आयपीएलदरम्यान ती महेन्द्रसिंह धोनी याची गर्लफ्रेन्ड होती. राय लक्ष्मी या अभिनेत्रीने तिला मराठीत काम करायचे आहे अशी आशा व्यक्त केली आहे. ती जर मराठी चित्रपटसृष्टीत आली तर मराठीतील तारकांना आणखी तीव्र स्पर्धेला सामोरे जावे असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ती लवकरच मराठीत काम करणार अशी घोषणा केली होती. एकूण पाहता लवकरच मराठी चित्रपटात नवीन चेहेरे पहायला मिळणार हे नक्की. पुणे येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत राय लक्ष्मीने आपले मराठी प्रेम व्यक्त केले. ती एका चांगल्या स्क्रिप्ट ची वाट बघत आहे असे हि तिने या वेळी सांगितले. यावेळी फ्रिकऑऊट एन्टरटेन्मेंटचे संजय कोलकत्तावाला उपस्थित होते. आतापर्यंत ५० हून जास्त दक्षिणेतील चित्रपटात झळकलेली राय यावेळी म्हणाली की, मी महाराष्ट्रीयनच आहे.

 

राय लक्ष्मी मुंबईत राहते आणि तिचे मराठी भाषेवर प्रेम आहे असे देखील तिने सांगितले तिला उत्तम मराठी बोलता येतं. तील मराठी चित्रपट संवेदनशील वाटतात. अशा संवेदनशील चित्रपटाचा भाग व्हावे असे तिला मनापासून वाटते. निर्माते दिग्दर्शक पहलाज निहलानी, दीपक शिवदासानी यांच्या ‘जुली-२’ या चित्रपटातून लक्ष्मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच ‘जुली-२’ हा जुली चित्रपटाचा सिक्वल नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.