Glamorous Photo shoot of Neha joshi done by Neha Mandlekar

Neha joshi 04

आज मराठी कलाकार तत्यांच्या सकस अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. मराठी व हिंदी चित्रपटसुर्ष्टी मध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केले आहे. अभिनेता व अभिनेत्री यांच्या कामाविषयी चर्चा आपण हमखास ऐकतोच पण आता या कलाकारांचे जोडीदार उत्तम कामगिरी करून प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. याचाच उद्धरण म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहा मांडलेकर यांनी केलेला फोटोशूट. नेहा मांडलेकरने अभिनेत्री नेहा जोशी यांचा एक ग्लॅमरस फोटो शूट केले असून याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

 

या फोटोशूटमध्ये नेहा जोशी यांचा अनोखा अंदाज पाह्यला मिळाला. नेहा या फोटोज मधे खूप ग्लॅमरस दिसत आहे. फक्त नेहा च्या फॅन्स मधेच नव्हे तर या फोटोशूट ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत देखील रंगली आहे.अभिनेता व अभिनेत्री प्रमाणे त्यांचे जोडीदार काही तरी वेगळे आणि हटके करुन स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहत आहोत. असाच एक प्रयत्न नेहा मांडलेकरनं यांनी केला असून तो यशस्वी झालाय आसा म्हणायला हरकत नाही. नेहाने केलेल्या या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

 

नेहा मांडलेकर यांच्या या क्रिएटिव्ह फोटोशूट ला विशेष दाद मिळताना दिसतंय तसेच या फोटोजवर कमेंटचा वर्षावही होताना दिसत आहे. अभिनेत्री नेहा जोशीने कायमच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मराठी-हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये नेहा जोशीनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाची सुरवात ‘क्षण एक पुरे’ ह्या प्रायोगिक नाटका पासून, तर छोट्या पडद्यावर ‘उन पाउस’ ह्या मालिके द्वारे झली . ‘पोष्टर बॉयज’ मधील कडक, मध्यमवर्गीय पत्नीची भूमिका असो, किंवा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम मॉल ‘ ह्या सिनेमात तिची मुख्य भूमिका असो, प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाने पूर्ण न्याय देत, तिने प्रेक्षकंवर छाप सोडलीय . ‘ड्रीम मॉल ‘ सिनेमातील तिच्या अभिनयाचे तर सर्वानीच कौतुक केले आहे. शिवाय, सध्या चालू असलेल्या ‘का रे दुरावा‘, मालिकेत आणि ‘वाडा चिरेबंदी ‘ नाटकातील तिचा अभिनय सुद्धा उल्लेखनीय आहे.

 

Neha joshi 01 Neha joshi 02 Neha joshi 03

Leave a Reply

Your email address will not be published.