Exclusive Photos from Urmila Kothare’s baby shower party

Urmila and Mahesh kothare

 

मातृत्वाचा आनंद, त्या प्रसंगी झालेली मनाची अवस्था आणि भावी मातेचा तिच्या येणाऱ्या बाळाचा गौरव “डोहाळेजेवणा” द्वारे केला जातो. या मंगल प्रसंगी सख्या शेजारणी आणि साऱ्या वडिलधाऱ्या स्त्रियांच्या घोळक्यात ही भावी माता सुखावून जात. डोहाळे जेवण म्हणजे घरातल्या सर्वांचीच घाई-गडबड. घरात बाळ येणार म्हणजे सर्वच त्याच्या विचारात असतात.

 

अश्याच आनंददायी वातावरणात अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे चे डोहाळेजेवण नुकतेच पार पडले. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे तिच्या गरोदरपणाला एखाद्या सणासारखी साजरी करताना दिसते आहे. सोशल मीडिया वर रोज तिचे येणारे फोटोज, व्यायाम किंवा डान्स करतानाचे फोटोज पाहून ती हहा प्रवास मस्त एन्जॉय करतेय अस नक्कीच वाटते. तिच्या डोहाळे जेवणाचा समारंभ पार पडला ह्या वेळेस घरी तिच्या कुटुंब सदस्यांच्या सोबत आणि फुलवा खामकर आणि क्रांती रेडकर ह्या तिच्या मैत्रिणीन बरोबर तिने आनंद लुटला.

 

क्रांती रेडकर आणि फुलवा खामकर ह्या उर्मिलाच्या अत्यंत जिवलग मैत्रिणी आहेत. तिच्याया खास मैत्रिणीनी मिळून उर्मिला साठी एक खास जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या पार्टीमध्ये सगळ्यांनी गुलाबी आणि निळ्या रंगाचे कपडे घालणे अशी थिम होती. या वेळी पिवळ्या रंगाचा गाऊन मध्ये नटलेली उर्मिला खूप गोड दिसत होती.उर्मिलाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिच्यासोबत तिचा नवरा आदिनाथ कोठारे उपस्थित होता. क्रांती रेडकर व फुलवा खामकर यांच्यासोबत अदिती सारंगधर, सोनाली खरे, अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुचित्रा बांधेकर, सोनिया परचुरे, दिपाली विचारे ह्या उर्मिलाच्या मैत्रिणी उपस्थित होत्या.

Urmila Baby Shower 09 Urmila Baby Shower 08 Urmila Baby Shower 07 Urmila Baby Shower 05 Urmila Baby Shower 04 Urmila Baby Shower 03 Urmila Baby Shower 02 Urmila Baby Shower 01