Exclusive photos Kranti Redkar’s secret Marriage and Mehendi

Kranti Redkar married 01

गेल्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच कलाकारांनी विवाहबंधनात अडकत जीवनातील नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. यावर्षीही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच काही मराठी कलाकारांनीही आपला जीवनसाथी निवडला होता. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरनं गुपचूप लग्न करून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. समीर वानखेडे या आयपीएस अधिकाऱ्याशी तिचा विवाह झाला आहे. १९ मार्चपासून सर्वांची लाडकी क्रांती रेडकर आता झालीये क्रांती रेडकर-वानखेडे.

क्रांती च्या लग्नसोहळ्याला जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते.

‘कोंबडी पळाली’ या गाण्यानं क्रांती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या दमदार स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलंय. तिनं बहुरंगी भूमिका विविध चित्रपटामधून साकारल्या तसेच ‘काकण’ या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही यशस्वीरीत्या पार पाडली.काही दिवसांपूर्वी प्रदराशीत झालेला ‘करार’ या चित्रपटापासून पासून तिच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पण कुणालाही कानोकानी खबर लागू न देता, क्रांतीनं आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी ‘शुभमंगल’ केलं.

क्रांतीनं फेसबुकवर स्टेटस अपडेट करून सगळ्यांना हि बातमी कळली. यावर तिने असे हि सांगितले कि , पती देशसेवेत असल्यानं फार मोठा गाजावाजा न करता साधेपणानं लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला होता. हे लग्न होण्या आधीपासून  ती आणि समीर हे  खूप चांगले मित्र होते. तिचा स्वभाव व वेडेपणा समजून घेणारा साथीदार तिला हवा होता आणि समीर तसाच आहे असे हि तिने सांगतले.

या लग्नानंतरही ती सिनेसृष्टीत काम करत राहणार आहे हे हि तिने स्पश्ट केले . क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे याना लग्नाचा हार्दिक शुभेच्छा !!

Kranti Redkar married 10

Page 1 of 9

Kranti Redkar married 10

Page 1 of 9

Leave a Reply

Your email address will not be published.