Colors Marathi 2Mad Special with Sai Tamhankar

sai tamahnkar mad2 01

२मॅड हा डान्स रिऍलिटी शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरु आहे. रवी जाधव , अमृता खानविलकर, उमेश जाधव हे या कार्यक्रमाचे जज आहेत तर अमेय वाघ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. . १० स्पर्धकांची टॉप मध्ये निवड झाली असून ते आपल्या प्रतिभेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. आतापर्यंत या मंचावर अनेक दिगग्ज व्यक्तींनी हजेरी लावली आहे आणि स्पर्धकांना प्रोत्साहित केले आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, नृत्य दिग्दर्शक अहमद खान आणि बॉलिवूड क्वीन कंगना राणावत यांनी कार्यक्रमात येऊन स्पर्धकांना नृत्याचे धडे दिले आहेत. नुकतीच या कार्यक्रमात प्रेक्षकांची लाडकी मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची नायिका सई ताम्हणकर गुढी पाडव्याच्या निमित्ताने शो मध्ये येऊन गेली. स्पर्धकांचे नृत्य आणि उत्साह पाहून सई भारावून गेली. स्पर्धकांचा नृत्याबद्दल असलेला मॅडनेस, प्रेम पाहून सई अचंबित झाली. यावेळी तिने स्पर्धकांशी संवाद साधला त्यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा केली आणि नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांची मने जिंकली.
तुषार या स्पर्धकाने यावेळी सई सोबत नृत्य करायची इच्छा व्यक्त केली सई ने लगेच त्याची इच्छा पूर्ण केली. आपलया आवडत्या नायिकेसोबत नृत्य करायला मिळाल्यामुळे तुषार खुश झाला. २मॅड च्या मंचावर सई ने आपल्या नृत्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या . आपलयाला नवीन वर्षात आत्मविश्वासाने नृत्य करायचे असल्याचे संकल्प तिने सांगितला

sai tamahnkar mad2 03
२मॅड शो गुढी पाडवा विशेष भागात प्रेक्षकांना स्पर्धकांच्या नृत्यामधून लोककलेचा अनुभव घेता येणार आहे. यामध्ये भारुड, जोगवा, कोळी नृत्य, गोंधळ, धनगर नृत्य या नृत्यशैलींचा समावेश आहे. मॅड २ मधील अफलातून स्पर्धकांनी पुढील प्रमाणे नृत्य सादर केले पलकने ‘लल्लाटी भंडार’, मितालीने सुंदर नाट्यसंगीतावर नृत्य सादर केले. तर श्री दळवीने ‘विंचू चावला’ आणि तुषारने ‘डोकं फिरलंया’ गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सईचे मन जिंकले.

Leave a Reply

Your email address will not be published.