Atul Kulkanri Shooting at Varanasi

Atul Kulkanri shooting at varanasi 01

आजकाल सर्व सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मेडिया चा उपयोग करतात. फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर आशय माध्यमातून फोटो, व्हिडिओ शेअर करून त्यांच्या फॅन्स पर्यंत वेळोवेळी माहिती पोहोचवत असतात. मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या एक आगमयी चित्रपटाचे शूटिंग वाराणसी येथे सुरु आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काढलेला एक फोटो फेसबुक अकाउंट वर शेर केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मि. परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता अतुल कुलकर्णी याना ओळखलं जातं.

वाराणसीतील एका नदीच्या काठाजवळ काढलेला अतुल कुलकर्णी यांचा एक फोटो त्याने नुकताच शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्ही नक्क चकित व्हाल आणि मुख्य म्हणजे या फोटोपेक्षा कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतुल कुलकर्णी या फोटोत लाइटरने सिगारेट शिलगावताना दिसत आहेत. धुम्रपान करणे हे आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे जाहीरपणे आहे धुम्रपान करताना काढलेला फोटो म्हणजे चे टीकेला आमंत्रण .अतुल कुलकर्णी यांनी सावधगिरी म्हणून या फोटोसोबत कॅप्शनमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.

अतुलने त्यांच्या फोटो सोबत लिहिलं की, ‘ वाराणसी शूट !! पल्याडचा किनारा …. हा सीनमधला फोटो आहे. Interesting वाटला म्हणून टाकलाय. धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे हे मला १०० टक्के मान्य आहे. मी स्वतः ते करत नाही आणि प्रोत्साहित पण करत नाही. मला माफ करा पण यानंतरही धुम्रपानाविषयी कमेंट्स आल्या तर त्या डिलिट होतील.’ पण वास्तविक पाहता फोटोवर आलेल्या प्रतिक्रिया पाहता अतुलला त्या डिलिट कराव्या लागणार नाही असे दिसते. याचा कारण कि अतुल च्या चाहत्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. ‘आम्ही तुम्हाला ओळखतो सर. तुम्ही धुम्रपानाच्या विरोधात आहात हे आम्हाला माहिती आहे’, छान फोटो अशाप्रकारच्या काही प्रतिक्रिया फोटोवर आलेल्या दिसतात.