Amruta Khanvilkar is the first Marathi celebrity to cross 1 lac followers on twitter

Amruta Khanvilkar 100 K 01

 

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा खूप मोठा फॅन फोल्लोविंग आहे. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो सगळ्यांचा जाणून घेण्याची उत्सुकता असते. काही दिवसांपुरवी अमृताच्या ट्विटर अकाऊंटची 90K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्स ना उत्सुकता होती ती १००K ची. अवघ्या काही दिवसांतच अमृताने १००K चा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K फोलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.

 

अमृताची आणि तिच्या फॅन्सची कनेक्टिविटी खूप चांगली आहे.सोशल मीडिया मधील ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा अपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलीवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.

 

Amruta Khanvilkar 100 K 02

 

ज्यावेळी तिच्या अकाउंटवर १००K फोलोअर्स झाले त्यावेळी तिला खूप आनंद झाला. या गोष्टीच संपूर्ण श्रेय ती तिच्या वर भरभरून प्रेम करणाऱ्या फॅन्सना देते त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय असे हे तिने सांगितले. १००K ला ती फक्त एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते. १००K फोलोअर्स टप्प गाठाण्याबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकरला मनःपूर्वक शुभेच्छा !!