Amruta Khanvilkar to become an entrepreneur.

Amruta k 01

 

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे अभिनयासोबत काही ना काही नवीन गोष्टी करताना दिसत आहेत. प्रत्येक नवीन गोष्ट सुरु करताना जर अनेक वर्षांचा अनुभव सोबत असेल तर पावलोपावली आपल्याला एक हिंमत आणि प्रेरणा मिळत असते. या आणि अश्या अनेक कलाकारानं पैकी एक असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील एका नवीन गोष्टीला सुरवात करण्याचे सांगतले आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने स्वत:च्या टॅलेंटवर एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत तसेच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मराठी मध्ये उत्तम अभिनय करणाऱ्या अमृताने हिंदी चित्रपटात देखील तितकेच सुंदर काम केले आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राझी’ चित्रपटात अमृताने ‘मुनिरा’ ची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली. या नंतर आलेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृताने जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या तिच्या गाजलेल्या चित्रपटनमुळे अमृता महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली. आणि अमृता आता लवकरच एका नवीन प्लॅनेटवर दिसणार आहे.

 

आत हे नवीन प्लॅनेट म्हणजे नेमके काय असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पण पडला असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत अमृता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या माहिती नुसार प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहयोगाने अमृता मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून काही नवीन प्लॅन्स तयार करत आहे.’ अमृता आता नवीन काय घेऊन येत आहे याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.