Actress Urmila Kothare expecting her first baby

Urmila Kothare to become mother 01

आपल्या आवडत्या कलाकारांविषयी सर्व गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहिमीच असते. अशीच एक गॉड बातमी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे या जोडीविषयी सध्या चर्चत आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही मराठी चित्रपटसृष्टीतील जोडी सर्वांनाच आवडते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आदिनाथ आणि उर्मिला यांच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या सर्व कुटुंबीयायांसाठी हि घरी बातमी आहे. ते लवकरच आजोबा होणार असून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच आई होणार आहे.

Urmila Kothare to become mother 03

 

Urmila Kothare to become mother 04

 

उर्मिलाने ही गोड बातमी फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करू सर्वांना दिली. नुकतंच मुंबईत येथे एका पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी उर्मिलाने रेड कार्पेटवर काढलेली ते फोटो तिने तिच्या फॅन्स सोबत शेर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप पाहायला मिळतोय. या फोटो सोयाबीत तिने ‘आयुष्यातील या महत्त्वपूर्ण टप्प्याला मी एन्जॉय करतेय,’ असे कॅप्शन लिहिलंय. उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ असल्यामुळे सर्वजण खूप आनंदी आहेत. २० डिसेंबर २०११ रोजी उर्मिला आणि आदिनाथ यांचा विवाह झाली होती. त्यांच्या लग्नाच्या ५ वर्षांनंतर उर्मिला आई होणार आहे.