Actress Spruha Joshi to work in this web series.

मराठी पाऊल पड़ते पुढे .. सध्या छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा आपल्या मराठी अभिनेत्री सर्वत्र झळकत आहेत .‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकां करून आपल्या अभिनयाने अभिनेत्री स्पृहा जोशीने रसिकांची मने जिंकली आहेत.उत्तम अभिनयामुळे तिने मराठी मनोरंजन जगतात स्वत:ची एक स्वतंत्र ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. सध्या ती हिंदी मनोरंजन क्षेत्राकडे वळली आहे आणि लवकरच ‘द ऑफिस’ या आंतरराष्ट्रीय सीरिजच्या अधिकृत रुपांतरणात दिसणार आहे. १३ एपिसोड्सच्या या मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे.

 

View this post on Instagram

ज्यांच्या आत काहीतरी तुटलंय ठुसठुसतोय काटा, खुपतंय खूप पूर्वीपासूनचं काही मी त्यांच्याकडे खेचली जाते अगदी सहज, नकळत. मला त्यांना सावरायचं असतं, म्हणून नव्हे. तसं तर मला स्वतःलाही सावरता येत नाही! पण मला त्यांच्याशी कनेक्ट करता येतं एका वेगळ्याच पातळीवर.. . भुगा भुगा झालेला मनासारखा एक अवयव रोज रात्री उशाशी घेऊन झोपताना कसं कसं किती किती दुखतं ते आम्हाला कळतं एकमेकांना बघून.. रोज सकाळी उठून 'हसू' नावाचा ऑइलपेंट मारायचा सुतकी चेहऱ्यावर, काल काहीच न झाल्यासारखा त्याचा ताण जाणवतो आम्हाला आमच्या चेहऱ्यावरच्या रेषारेषांच्या जाळीतून.. वाट काढत मान मोडत, जगत राहायच्या ओढीतून सतत तहान व्याकूळ व्हायच्या, आमच्या शाश्वत खोडीतून एकमेकांना दिलासा देत हे इतकंच रोज करतोय आम्ही उधारीचं हसू आणून..! – स्पृहा ✍️ 📸 @lets_draw_light Jewellery by @aadyaaoriginals

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

या कर्मचाऱ्यांचं आयुष्यत घडणाऱ्या गोष्टी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदी परिस्थिती यात दाखवणायत येणार आहे. ‘द ऑफिस’ मध्ये स्पृहा जोशी गीता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. गीता ही रीअल इस्टेट डीलर आहे. नायक जगदीप चढ्ढा (मुकुल चढ्ढा) याला त्याचे पहिले घर घेण्यात ती मदत करते. या सीरिजमधून पहिल्यांदा स्पृहा डिजिटल मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण करत आहे.

 

 

हि मालिका आपल्याला मिळाली या गोष्टीचा स्पृहा जोशी ला खूप आनंद आहे . तसेच ही कथा आणि ती सांगण्याची मॉक्युमेंटरी पद्धत हि तिच्यासाठी अगदी नवीन आहे. या मालिकेतील सर्व सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. तसेच प्रेक्षकांनाही ही मालिका आवडेल असे हि तिने सांगितले. ‘द ऑफिसच्या’ कलाकारांमध्ये मुकुल चढ्ढा, गौहर खान, रणवीर शौरे, गोपाल दत्त, सयनदीप सेनगुप्ता, समृद्धी दिवाण, प्रियंका सेटिया, अभिनव शर्मा, गाविन मेथलका, प्रीती कोचर, सुनील जेटली, चाइन हो लिआओ, नेहपाल गौतम आणि मयुर बन्सीवाल आदींचा समावेश आहे.