Actress Sonalee Kulkarni completes 10 years in the Industry

Sonalee Kukarni completes 10 yrs

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज चित्रपटाच्या दुनियेत आपली यशस्वी १० वर्ष पूर्ण केली आहे. १० वर्षांपूर्वी ह्याच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी तिचा पहिला चित्रपट “बकुला नामदेव घोटाळे” प्रदर्शित झाला होता. गेल्या १० वर्षात सोनाली हिने पुष्कळ यशस्वी चित्रपटान मध्ये काम केले आहे.

 

सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.

 

Sonalee Kukarni completes 10 yrs 01

 

“नटरंग” ह्या चित्रपटनंतर सोनाली ला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ह्या चित्रपटातील “अप्सरा आली” हे गाण प्रेक्षकांना फारच आवडलं होत. अजिंठा, झपाटलेला २, क्लासमेट, मितवा आणि पोस्टर गर्ल काही गाजलेले चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच सोनाली ने आपला ठसा हिंदी चित्रपटसृष्टीतही उमटवला आहे. सिंघम २ आणि मस्ती २ मध्ये तिने काम केले आहे.

 

लावकारच तिचा “हम्पी” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ह्यातील तिची केसांची स्टाईल विषयी सगळीकडे चर्चा आहे .सोनाली हिने तिचा आनंद ट्वीटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे. सिनेसृष्टीत १० वर्ष यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!