Is actress Sakhee Gokhale going to get married..

सध्या मराठी चित्रपट सृष्टीत विवाह बंधनाची लगबग पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांचे लग्न पार पडलं आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा लग्न सोहळा झाला. अशातच काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहे असे बोले जात आहे . मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत यांची लव्ह स्टोरी साध्य सगळीकडे जोरदार चर्चेत आहे. 

 

Sakhee G 01

 

गेल्या काही दिवसापासून आपण या दोघांना अनेक फोटोमधून एकत्र पहात आहोत. विविध कार्यक्रम ,कॉफी घेणे किंवा मग सिनेमाला पाहायला जाणं असे अनेक एकत्र फोटो या यांनी रसिकांसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे आसा अंदाज बांधला जात आहे. नुकताच सखीने तिच्या सोशल मीडिया वर एका फोटो शेर केला असून या फोटोवरून ती लग्न करणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोला तिच्याच फॅन्स ने खूप सारे शुभेच्छा आणि लाईक्स दिल्या आहेत. तिला आलेल्या कॉमेंट्स वर सखीने सध्या कोणत्याही प्रकारचे उत्तर दिला नसून तिच्या उत्तराची प्रतीक्षा होत आहे. तिच्या या फोटो मुळे सखी आण सुव्रत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून सनई चौघडे कधी वाजणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

 

Sakhee G 02

 

सखी आणि सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली , या नंतर हे दोघे चांगले मित्र बनले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. सोशल मीडिया वरील त्यांचे एकत्र फोटो पाहून बऱ्याच काळापासून हे दोघे एक मेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरु आहेत. विशेष म्हणेज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुव्रतने सखीसाठी एक खास पोस्ट टाकली होती आणि ती पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते.