Actress Kranti Redkar thanks these girls.

‘जत्रा’ सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे अभिनेत्री क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘कोंबडी पळाली…’ या सुप्रसिद्ध गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अर्थात क्रांती रेडकर . जत्रा या चित्रपटाव्यतिरिक्त तिने ‘ऑन ड्युटी 24 तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यांसारख्या चित्रपटातून तिच्या अभिनयाची जादू दाखवली. उत्तम अभिनयासह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून देखील तिने काम सुरू केली आहे.

 

Kranti Redkar 02

 

उर्मिला कोठारे आणि जितेंद्र जोशी यांहचय प्रमुख भूमिका असणारा ‘काकण’ हा चित्रपट तिने दिग्दर्शित केले होते. काही दिवसांपूर्वी तिचा रॉकी चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु काही कारणामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अभिनेत्री क्रांती ने मार्च २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या सोबत लग्न केले. या नंतर तिने ने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला.तिच्या या जुळ्या मुलींना सांभाळण्यासाठी क्रांतीने केअर टेकर ठेवली आहे. जिचे आभार नुकतेच क्रांतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून मानले आहे.

 

Kranti Redkar 01

 

क्रांतीने तिच्या सोशल मी़डिया अकाउंट वर तिच्या मुलींच्या केअर टेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने या फोटो सोबत असे लिहिले आहे ,” मी आणि माझ्या मुलींची सांभाळ करणारी केअर टेकर. ती दररोज माझ्या मुलींची जेवढी काळजी घेते त्यासाठी मी तिचे आभार मानेन तेवढे कमीच आहे. तिची खूपच मदत होते. तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत व ती नेहमी आनंदी राहो, ही सदिच्छा. सध्या ती माझी फोटोग्राफरही झाली आहे.” तिने पुढे असे लिहिले की, तिला दोन मुले आहेत. त्यामुळे आणखीन एक केअर टेकर असून तिचा यात फोटो नाही.तसेच तिचाही फोटो ती लवकरच शेअर करणार आहे. तिचे या मुलींवर प्रेम आहे कारण पैसे मदत विकत घेऊ शकतात पण प्रेम नाही. या दोघी मुलींचीतिच्या मुलींची खूप प्रेमाने काळजी घेतात.