Viacom18 motion pictures signs Ankush Chaudhari for its Marathi venture

Ankush Choudhari new movie 03

नुकताच अंकुश चौधरी यांचा नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली . या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 मोशन पिक्चर्स करणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी ‘क्लासमेट्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर अंकुश च्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा तेच करत आहेत.

 

अंकुश चौधरी हे मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्याने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपटातून काम केले आहे. दुनियादारी, डबल सिट, गुरू दगडी चाळ हे त्यांचे काही विशेष गाजलेले चित्रपट. २०१७ च्या सुरवातीला आलेला तात्यांच्या चित्रपट ती सध्या काय करते हा बॉक्स ऑफिस हिट ठरला होता. या चित्रपटाने खूप चांगली कमाई केली होती. सध्या अंकुश चौधरी हे मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. त्यांनी केलेल्या विविध भूमिका व त्यांचे अभिनय कौशल्य याचे कायम कौतुक झाले आहे. ती सध्या काय करते या चित्रपटानंतर अंकुश आता या नवीन चित्रपटाच्या तयारीत लागला आहे.

 

Ankush Choudhari new movie 02

अंकुश चौधरी आणि आदित्य सरपोतदार यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव सध्या जाहीर करण्यात आलेलं नाही. परंतु या चित्रपटात अंकुश चौधरीची महत्त्वपूर्ण भूमिका असून या आधी कधी न साकारलेली भूमिका तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे लेखन उपेंद्र सिध्दये यांनी केले आहे.

 

Ankush Choudhari new movie 01

 

क्लासमेट या चित्रपटाच्या आदित्य सरपोतदार आणि अंकुश यांची खूप चंगली ट्युनिंग जमले होते. त्यामुळे पुन्हा एकदा आदित्यसोबत काम करण्यास अंकुश उत्सुक आहे असे म्हटले जात आहे. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत असलेला अंकुश चा हा आगामी चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ ला प्रदर्शित होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.