Veteran actor Madhukar Todarmal passes away

Madhukar Todarmal 01

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, “गुड बाय डॉक्‍टर’, “गोष्ट जन्मांतरीची’ अशा काही नाटकांबरोबरच “सिंहासन’, “आत्मविश्‍वास’, “बाळा गाऊ कशी अंगाई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच लेखक व दिग्दर्शक-निर्माते प्रा. मधुकर तोरडमल (वय ८४) यांचे काल वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रमिला, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

 

 

प्रा. मधुकर तोरडमल हे मराठी रंगभूमीचा एक महत्वाचा आधारस्तंभ होते.‘मामा’ अशा नावाने प्रा. मधुकर तोरडमल यांना मराठी चित्रपटसृष्टीत ओळखले जात होते. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे पाच हजाराहून अधिक प्रयोग झाले होते .या नाटकात त्यांनी प्रा. बारटक्केची भूमिका साकारली होती.फक्त अभिनय नाही तर ते उत्तम लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि अनुवादक अशी चौफेर वाटचाल अगदी यशस्वी पणे पार पडत होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. याशिवाय कादंबरी, नाटक, चारित्र्य असे साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची मराठी रंगभूमीला नेहमीच उणीव वाटत राहणार आहे.

 

 

दुर्दैवाने त्यांचे मृत्रपिंड निकामी झाले होते त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते एशियन हार्ट या रुग्णालयात त्यांचा उपचार सुरु होता. ते अनेक दिवसांपासून प्रकृतीशी लढा देत होते. गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. २ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ जुलै २०१७ रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

Madhukar Todarmal 02

 

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले – मुख्यमंत्री

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, अभिनय, लेखन आणि अनुवाद अशा तिन्ही प्रांतांत प्रा. तोरडमल यांनी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रा. तोरडमल यांना मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध करण्याचा ध्यास होता. “तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या त्यांनीच लिहिलेल्या नाटकातील त्यांची प्रा. बारटक्के ही व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहील. नाट्यलेखनाबरोबरच त्यांनी कादंबरी, चरित्र आणि अनुवाद असे साहित्यप्रकार ताकदीने हाताळले.

Leave a Reply

Your email address will not be published.