Varun Dhavan and Alia Bhatt launch Ganpati song from upcoming movie ‘Bhikari’

Bhikari song launch 05

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने हृदयांतर सिनेमातून मराठी सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आता त्यांच्या पाठोपाठ बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनीही मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. भिकारी या चित्रपटाला सोशल मेडीआयवर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भिकारी या आगळ्या वेगळ्या शीर्षकामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाटत आहे.

Bhikari song launch 04

या चित्रपटातील बाहूंचर्चित गाणे ‘देवा हो देवा’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे गणपतीवर आधारित असून मराठी गाण्यानं पैकी सर्वात श्रीमंत गाणे ठरले आहे. या गाण्याचा भव्य लाँच सोहळा अंधेरी येथील पी वी आर आयकॉनमध्ये झाला. या वेळी सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्ट तसेच बॉलिवूडस्टार आलिया भट आणि वरून धवन यांची उपस्थिती होती. डान्समास्टर गणेश आचार्य यांना या दोघांनी या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या व एक सुंदर डान्स परफॉर्मस् देखील केला.

Bhikari song launch 03

अनेक वर्षांपासून बॉलिवूड कलाकरांना आपलय ठेकात नाचवणारे गणेश आचार्य यांनी ‘देवा हो देवा’ या गाण्यस्तही भरपूर मेहेनत घेतली आहे. तसेच हे गाणे बॉलिवूड गाण्यांना लाजवेल इतके भव्य-दिव्य आहे. मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. या गाण्यामध्ये ३५ फुट उंच भव्य गणेशमूर्तीचे दर्शन प्रेक्षकाना घडणार आहे. तसेच या गाण्यात तब्बल एक हजार कलाकार समाविष्ट आहेत. ‘देवा हो देवा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरु ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे विकी नागर आणि प्रसन्न देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे.

Bhikari song launch 02

सुखविंदर सिंग आणि दिव्य कुमार यांनी हे गाणे गेले असून संगीत दिग्दर्शक मिलिंद वानखेडे यांनी या गाण्याला ताल दिला असून, यात ढोलताशा, झांजा तसेच सतार या वाद्यांचादेखील वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि भिकारी सिनेमाचे डीओपी महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात हा भव्य डोलारा चित्रबद्ध झाला असल्यामुळे, हे गाणे सगळयाच बाबतीत समृद्ध ठरत आहे.‘भिकारी’ चित्रपटातील हे गाणे येत्या गणेशोत्सवात नक्कीच सगळीकडे गजर करणार. आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा ‘भिकारी’ हा चित्रपट येत्या ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा आहे.

Bhikari song launch 01

नक्की ‘भिकारी’ चित्रपटातील ‘देवा हो देवा’ हे गाणं-

Leave a Reply

Your email address will not be published.