Upendra Limaye & Neha Pendse together for the first time

Neha Pendse +Upendra Limeye 01
नगरसेवक या चित्रपटानिमित्त उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे हि जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदा पाह्यला मिळणार आहे. जेव्हा कधी लोकशाही ही लोकहिताकरता न राहता जेव्हा सत्ताधीशांच्या हितासाठी सज्ज होते त्यावेळी या सत्ताधीशांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे येतो तो म्हणजे नगरसेवक.उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात त्यांच्यासोबतच सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, सविता मालपेकर, विजय निकम, श्याम ठोंबरे, प्रियांका नागरे, त्रियोग मंत्री, अभिजीत कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Neha Pendse +Upendra Limeye 03

उपेंद्र लिमये याना आपण नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तम हावभाव आणि शब्दांचे अचूक टायमिंग असल्यामुळे त्यांच्या अभिनयाची छाप कायम प्रेक्षकांच्या मनावर असते. कायमचा उपेंद्रने आशयप्रधान चित्रपटांमध्ये अतिशय सशक्त भूमिका साकारल्या आहेतया वेळी नगरसेवक या चित्रपटाच्या माध्यमाने त्यांची एक वेगळी झलक या आगामी चित्रपटात पाहाता येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नगरसेवक चित्रपटात अभिनेत्री नेहा पेंडसे उपेंद्र लिमये यांच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहेत. मे आय कम इन मॅडम हि त्यांची हिंदी मालिका खूप गाजत आहे. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. नेहमी हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात वावरणारी नेहा नगरसेवक या चित्रपटात मात्र अगदी सोज्वळ भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. आपल्या चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे नगरसेवक या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पाड्यावर एकत्र काम करणार आहेत. नगरसेवक एक नायक हा चित्रपट दिपक कदम यांनी दिग्दर्शित केला आहे. शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नगरसेवक या चित्रपटात उपेंद्रने मल्हार या तडफदार तरुणाची भूमिका साकारली आहे. उपेंद्रची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल हे नक्कीच . नगरसेवक हा चित्रपट 31 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.