Upcoming movie ‘Bus Stop’ Music Launch

Busstop music launch 02

मराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा ‘बसस्टॉप’ या चित्रपटाचा म्युजिक लाँच सोहळा संपन्न झाला. या चित्रपटात आजचे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ अनुभवी कलावंतां एकत्र काम करत असल्यामुळे हा चित्रपट मनोरंजनाची मोठी मेजवानीच ठरणार आहे.गणराज असोशिएट्स प्रस्तुत ‘बसस्टॉप’ या चित्रपटाचे निर्माते सुप्रसिद्ध मराठी रॅपर श्रेयश जाधव हे असून समीर हेमंत जोशी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातील गाणी आजच्या पिढी प्रमाणे फ्रेश आणि मनमोहक आहेत. ‘मूव्ह ऑन’, ‘आपला रोमान्स’, ‘घोका नाही तर होईल धोका’ आणि ‘तुझ्या सावलीला’ अशी या चित्रपटातील गाणी जणू आजच्या तरुणपिढीची जीवनपद्धिती दर्शवणारी आहेत.

 

Busstop music launch 03

 

या गाण्यांना हृषिकेश-सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर या नव्या दमाच्या संगीतकारांनी संगीत दिले असल्यामुळे, ही सर्व गाणी तरुण पिढीला भुरळ पडणारी आहेत. रोहित राऊत आणि प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर आवाजातील ‘मूव्ह ऑन’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून हृषिकेश-सौरभ-जसराज या त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेले आहे. ‘आपला रोमान्स’ हे गाणे श्रुती आठवले व जसराज जोशी यांनी गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहे. आदित्य बेडेकरने संगीत दिग्दर्शित केलेले योगेश दामले लिखित ‘तुझ्या सावलीला’ आणि ‘घोका नाहीतर होईल धोका’ या गाण्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. ज्यात रुपाली मोघे आणि सागर फडके या जोडीने ‘तुझ्या सावलीला’ या गाण्याला स्वरसाज चढवला असून, सागर फडके याच्या अवाजातील ‘घोका…’हे गाणे अधिकच दमदार आणि प्रभावशाली झाले आहे.

 

Busstop music launch 01

 

‘बसस्टॉप’ या चित्रपटमध्ये अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अशी तगडी स्टारकास्ट असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी ह्या ज्येष्ठ कलाकारांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सर्व स्टारकास्टच्या जल्लोषपूर्ण वातावरणात मुसिक लॉंच झाला तसेच चित्रपटाचा ट्रेलरदेखील रसिकांना दाखविण्यात आला.

 

‘बसस्टॉप’ हा चित्रपट २१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे तोपर्यंत एन्जॉय करा या चित्रपटातील दमदार गाणी.

Leave a Reply

Your email address will not be published.