‘Swwapnil Joshi’ to play a negative role for this upcoming movie

Swwapnil Joshi in Negative Role 02

 

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी लवकरच खलनायकच्या भूमिकेत आपल्यासमोर येत आहे. गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सुपरस्टार नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आला आहे. ‘रणांगण’ या आगामी चित्रपटात तो खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच सोशल मिडिया वर स्वप्नील जोशी चा एक वेगळा लुक लाँच करण्यात आला.

 

Swwapnil Joshi in Negative Role 01

 

रणांगण या चित्रपटातून रणांगणात सुरू असलेलं एक वेगळंच युध्द प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात दोन दिग्गज कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत. या शिवाय या चित्रपटात सिध्दार्थ चांदेकर,प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे आशा उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.बाप-मुलाला एकमेकांविरोधात उभं करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केले आहे. आत्तापर्यंत रोमँटिक भूमिका साकारून तरूणींच्या मनावर राज्य करणारा स्वप्नील जोशी रणांगण या चित्रपटातून पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारत आहे.

 

52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तसेच अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘रणांगण’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणारा हा स्वप्नीलमधील खल-नायक पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत.