Swapnil Joshi will be seen in this upcoming horror movie.

अभिनेता स्वप्नील जोशी म्हटलं कि आपल्या डोळ्या समोरे येतो रोमँटिक हिरो. सध्या अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या भूमिकांमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. मराठीचित्रपटसृष्टीत त्याची चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला तो छेद देण्याचा प्रयत्न करत असून सध्या विविधांगी भूमिकांची निवड करताना दिसत आहे. बळी आसा स्वप्नील जोशी चा नवा चित्रपट येत आसून या आगामी चित्रपटात स्वप्नील आपल्याला आगळ्यावेगळ्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाची कथाही थोडीशी हटके असून नुकताच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे .अभिनेता स्वप्नीलने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

 

Bali

 

स्वप्नीलची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बळी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया करत आहेत. तर निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार हे करत आहेत.

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे आपल्याला वाटेल. २०२० साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे चित्रपटाच्या कथेविषयी आणि स्वप्नील नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

bali 01

 

या चित्रपटाविषयी बोलताना स्वप्नील जोशी ने सांगतली कि हा चित्रपट एक हॉरर पॅट असून त्याला त्याच्या आवडत्या टीम बरॊबर काम करण्याची संधी मिळत आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील स्वप्नील ची आवडती माणसे आहेत. चित्रपटाची टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल अशी त्याला पूर्ण खात्री आहे.