Swapna Waghmare Joshi’s forthcoming film ‘Tula kalnar nahi’

Tula kalnar nahi 01

मराठी चित्रपटनी सध्या वेगळी उंची गाठली आहे. नव नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तरी सर्वत्र मराठी मनोरंजनसृष्टीची वाहवा पण होत आहे. नावीन्य पूर्ण संकल्पना चित्रपटाची वेगळी युनिक नावे उत्तम संगीत आसा अनुभव आपल्याला सध्या येत आहे.

 

स्वप्ना वाघमारे जोशी या आशयच एक दिग्दर्शिका आहेत ज्या कायम नवीन काहीतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आज पर्यंत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कायम नावानं विषय त्या उत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर घेऊन येतात. त्यांच्या ‘मितवा’ या चित्रपटांतून प्रेमाची आणि मैत्रीची एक वेगळी ओळख प्रेक्षकांसोमरे आली तसेच लाल इश्क’च्या माध्यमातून गूढ रहस्यमय मनोरंजन केलं तसेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला त्यांचा चित्रपट ‘फुगे’ मध्ये सुबोध भावे आणि स्वप्नील जोशीची भन्नाट केमिस्ट्री दाखवून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता पुन्हा त्या एक नावानं चित्रपट घेऊन येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव ‘तुला कळणार नाही’ असे असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले.

 

‘तुला कळणार नाही’ या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा सुबोध भावे साकारणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंघ बरन आणि कार्तिक निशानदार करणार आहेत.निरव शाह, ईलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. सिनेकॉर्न इंडिया यांच्या सहकार्याने, सक्षम फिल्म्स आणि जीसीम्स प्रस्तुत ‘तुला कळणार नाही’ हा चित्रपट ८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tula kalnar nahi 02

नक्की पहा या चित्रपटाचा फर्स्ट लुक.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.