Sushant Shelar enters Shivsena ..

Sushant Shelar shivsena 01

सध्या मुंबईत महापालिकेत निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहे. नेते आणि कार्यकर्त्यांच्या यांच्या एका पक्षातून दुस-या पक्षात कोलांटउड्या सुरू आहेत. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर अनेकांनी शिवसेनेतून काढता पाय घेतला हे तर तुम्हाला माहीतच आहे.

बॉलिवुडच असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी बऱ्याच कलाकारांनी राजकारणात सक्रिय होऊन आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत उद्धरणे म्हणजे अमोल कोल्हे, आदेश बांदेकर. यांच्याच पाऊलावर पाउल ठेवत अभिनेता सुशांत शेलार राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नुकताच त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सुशांतने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्याचा या प्रवेषाच्या वेळी संजय राऊत यांनी देखील उपास्थिती लावली. या आधी नितेश राणेंनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नेतेअशी सुशांत शेलारची ओळख होती.स्वाभिवानी चित्रपट सेनेचा सुशांत अध्यक्षही होता. मात्र आता सुशांत शेलार यांनी नितेश राणेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.सुशांत शेलार यांनी शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे.आतापर्यन्त सुशांत शेलार यांनी मुंबईत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घडवले आहेत. त्यामुळे तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसणार आहे. त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत , आता राजकारणात आपली छाप पाडुशकेल कि नाही यावर सगळ्यांचा लक्ष लागला आहे .

सुशांतने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष हे त्याचे विषेश उल्लेखनीय चित्रपट .सुशांतने या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक टीव्ही वरील मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत चा दुनियादारी हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.”सस्ती चिजो का शौक हम भी नाही राखते” हा त्याचा फेमस डायलॉग प्रेक्षकांना खूपच भावला होती.
कला क्षेत्रासोबतच सुशांत याने राजकीय क्षेत्रातही नेहमीच आपले योगदान दिले आहे. त्यामुळे आता शिवसेने मधील त्याची पुढची वाटचाल कशी होईल हे बघणे फारच महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.