Superstar Salman Khan shared this Marathi Movie trailer on social media.

Mauli 03

 

नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला. या चित्रपटाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलर २ मिनिटे ५० सेकंदाचा असून या मधे रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. या आधीही रितेश च्या ‘हात भारी…. सगळंच लय भारी”, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. तसेच या चित्रपटाने बॉक्सऑफिस वर चांगली कमाई केली होती . लय भारी या चित्रपटातील रितेशने साकारलेला ‘माऊली’ रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता.

 

Mauli 02

 

आता रितेशच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची हि रसिकांना तितकीच उत्सुकता लागली होती .अनेक हिंदी चित्रपटात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा दिसणार यामुळे प्रेक्षकांची हि इच्छा आता नक्की पूर्ण होणार .

माऊली या चित्रपटात सर्जेराव देशमुख असं रितेश च्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. या ट्रेलरमध्ये गावातले गुंड धुमाकूळ माजवत असतात त्याचवेळी रितेश म्हणजेच माऊलीची एंट्री होते. इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला…आपल्या सारखा TERROR नाय…. असा त्याचा डायलॉग आहे. या ट्रेलरला प्रेक्षांकची भरपूर पसंती मिळत आहे . आता विशेष म्हणजे बॉलिवूड मधील दबंग सलमान खानलाही हा ट्रेलर आवडला असून त्याने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहलं की सर्वांचा माऊली आणि आपला भाऊ येतोय, एन्ट्री वर शिट्टी नक्कीच वाजवा…

 

 

Mauli 01

 

काही दिवसांपूर्वीच ‘माऊली’ चित्रपटाचा टीझर खुद्द शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंवरून शेअर केला होता. त्या नंतर कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! रितेशने शेअर करताच त्या व्हिडीओलाही रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपटर प्रदर्शित झाल्या नंतर प्रेक्षकांची काय प्रेतिक्रिया असेल हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.