Sunny Pawar to debut in Marathi Film Industry

Aa Ba Ka Sunny Pawar 01

 

बालकलाकार ‘सनी पवार’ याने ‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. या चित्रपटातील ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये सनीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्याच्या कामगिरी चा कौतुक म्हणून त्याला ‘द रायझिंग स्टार’ या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार लंडनमध्ये देण्यातआला त्यावेळी बराक ओबामा, रॉक, सचिन तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले होते.

 

लवकरच हा हॉलिवूड स्टार आपल्याला मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘अ ब क’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून सनी पवार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. ‘हरी’ हे त्याचे चित्रपटातील व्यक्तिरेखेचे नाव आहे. सध्या इयत्ता ४ थी मध्ये शिकणारा सनी या चित्रपटाच्या माध्यमाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.‘अ ब क’ हा चित्रपट ग्रॅव्हेटी एण्चरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब यांची प्रस्तुती आणि मिहीर कुलकर्णी यांची निर्मिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमर शेडगे हे असून लेखन आबा गायकवाड यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन महेश आणे हे चित्रपटाचे कॅमेरामन आहेत.

संगीतकार बापी – तुतल यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असून यातील गाणी गुरू ठाकूर याने लिहली आहेत. या आधीही बापी – तुतल यांनी ‘सरकार राज’, ‘रक्तचरित्र’, ‘भूत’ अशा अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. सनी पवारसह तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी असे अनेक दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात काम करणार आहेत.

 

Aa Ba Ka Sunny Pawar 02

 

विशेष म्हणजे ‘अ ब क’ हा चित्रपट एकाच वेळी पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.