Sunil Shetty and Amruta Fadnavis spotted at the launch of this upcoming movie

Marathi movie aa ba ka 01

काही दिवसं पूर्वी अ ब क’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि मा. अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.’अ ब क’ हा चित्रपट ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी यांची निर्मिती आहे. या समारंभाच्या वेळी लायन’ फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित लावली.

 

ग्रॅव्हेटी ग्रुप त्यांच्या गेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे अनेक वर्षांपासूनप्रसिद्ध आहेत. सामाजिक विषयावरील दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून ते इथूनपुढे हि समाजसेवा कायम सुरु ठेवणे आहेत. निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी सांगितले ,”सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे आणि या चित्रपटात मी हि काम करतोय मला मराठी चित्रपट खूप आवडतात”.

 
या कार्यक्रमाच्या वेळी उपसत सुपरस्टार अभिनेते सुनील शेट्टी यांनी संतले कि ते उत्तम मराठी बोलतत् तसेच ‘अ ब क’ हा हि चित्रपट खूप यश संपादन करेल अशी त्यांना खात्री वाटते. तसेच अमृता फडणवीस यांनी सांगतले कि ,”मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे” या विषयवार आधारित या चित्रपटाला व संपूर्ण टीमला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. अमृता फडणवीस या चित्रपटासाठी पार्श्वगायण करणार आहेत.

 

‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करत आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे संगीत राहुल रानडे यांचे आहे.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या चित्रपटात सनी पवार सह, नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्ग्ज कलावंत झळकणार आहेत.

 

विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी मराठी,हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.