Subodh Bhave’s daily soap ‘Tula Pahate Re’ gains popularity

Tula pahate re 04

 

सुबोध यांची ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या खूप गाजते आहे. छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. घराघरात घडणाऱ्या घडमोडी या मालिकांमधून दाखवल्या जातात. यामुळे या मालिकांशी रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. प्रेक्षकांना असा वाटतं जणू काही मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आपल्या आजूबाजूला सुरू आहेत. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

 

Tula pahate re 01

 

यात सध्या ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकले असून हि मालिका अत्यंत लोकप्रिय झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या पहिल्या स्थानावर झी मराठी वरीलच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. आणि तुला पाहते रे हि मालिका सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.

 

Tula pahate re 02

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची मुख्य भूमिका आहे. चौथ्या स्थानावर चला हवा येऊ द्या आणि पाचव्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे संभाजी राजांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत.