Subodh Bhave ready to direct his second Marathi film

Subodh Bhave directing 2 movie 04

आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकणारा अभिनेता सुबोध भावे आता परत एकदा दिग्दर्शकच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.सुबोध भावे दिग्दर्शन करत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या आधी सुबोध भावे ‘फुगे’मध्ये एकदम यूथफुल हटके भूमिकेत दिसला. या चित्रपटामुळे सुबोध भावे यांची आतापर्यंत असेल इमेज ब्रेक करून एक वेगळी ओळख निर्माण केली. तसंच बॉलिवूडपेक्षाही वेगवेगळ्या भाषांमधले प्राद‌ेशिक सिनेमे करण्यात त्याला जास्त रस आहे. बॉक्स ऑफिस वर फुगे हा एक यशस्वी चित्रपट ठरला . सुबोधच्या आयुष्यातील काही सर्वोत्तम आणि महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’, ‘कट्यार..’

 

Subodh Bhave directing 2 movie 02

 

आज आपण पाहतो अनेक अभिनेते-अभिनेत्री दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. सुबोध भावे नेहेमीच मालिका, नाटक आणि सिनेमा यामधून आपले अभिनय कौशल्य दाखवत आले आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुरवात केली. तसेच या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. लवकरच ते एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

Subodh Bhave directing 2 movie 01

 

‘पुष्पक विमान’ असे या चित्रपटाचे नाव असून सुबोध भावे यांचा हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यामध्ये वैभव चिंचाळकर त्याना सोबत करणार आहे .‘पुष्पक विमान’ या चित्रपटाचे पोस्टर दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिवशी सोशल मिडीयावरून प्रसिद्ध करण्यात आले.

 

 

गुणी अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काय कमाल दाखवणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर भरपूर यशस्वी व्हावा या साठी हार्दिक सुभेच्छा..

Subodh Bhave directing 2 movie 03

Leave a Reply

Your email address will not be published.