Special trailer of Prasad Oak’s upcoming movie ‘Kaccha Limbu’ launched

Kachha Limbu Trailer launch 02

नुकताच प्रसाद ओक दिग्दर्शित ​कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँच मुळे प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटविषयी उत्सुकता अजून वाढीला आहे. कच्चा लिंबू हा अभिनेता प्रसाद ओकचा स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रवी जाधव यांचा पहिला चित्रपट आहे . या चित्रपटाचा भरपूर भाग हा ब्लॅक अँड व्हाईट असा शूट करण्यात आला आहे. आणि विशेष मन्हजे हा प्रयोग प्रेक्षकांना आवडलाय असे हि म्हण्याला हरकत नाही. या ट्रेलर ला प्रेक्षकांची भरपूर पसंत मिळताना दिसत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम, अनंत महादेवन अश्या उत्तम कलाकारांची प्रमुख भूमिका आहे . त्यामुळे या चित्रपटात नक्की काय आहे हे जाणून घेण्याची चुणचुण सगळ्यांचा वाटते आहे.

 

Kachha Limbu Trailer launch 01

 

रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित कच्चा लिंबू या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळा या चित्रपटाच्या संपूर्ण टीम च्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. या टीझर ला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दाखवली. ‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ अशी या चित्रपटाची दमदार टॅग लाईन आहे. आपल्याला कायम असे वाटते कि आपले आयूष्य सुखी असावे तसेच आपल्या अपेक्ष अगदी सध्या आहेत. पण वास्तविक पाहता कायम आपण जसा विचार करतो तसेच होते असे नाही. आपलं आयुष्य कायम नवनवीन गोष्टी आपल्यासमोर आणते. या अनपेक्षितपणे आलेल्या वळणाला हसतमुखाने सामोरे जाणे म्हणजेच आयुष्य जगणं असतं. असेच साधे सरळ पण तितकेच ‘स्पेशल’ असणारे काटदरे कुटुंब आपल्याला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

Kachha Limbu Trailer launch 03

 

कच्चा लिंबू या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारे रवी जाध यांनी नटरंग, टाइमपास यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच प्रसाद ओक याना आपण अनेक चित्रपटमालिका व नाटकान मधून एक उत्तम अभिनेता म्हणून पाहत आलो आहोत . आता दिग्दर्शक म्हणून ते काय कमल दाखवतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कच्चा लिंबू हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.