Sonalee Kulkarni will play lead role in ‘Hirkani’

Hirkani 01

प्राचीन काळातील एक धाडसी आई अर्थात हिरकणी . हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाचा खोल कडा उतरुन खाली गेली.आपण लहान असताना इतिहासात ज्या धाडसी ‘हिरकणी’ ची गोष्ट वाचली तोच अनुभव आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार आहे .‘हिरकणी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘हिरकणी’ ची भूमिका साकारणार आहेनुकताच या सिनेमाचे मुख्य पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

 

Hirkani 02

 

‘हिरकणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. आपल्या पुस्तकातील हिरकणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी रुपेरी पडद्यावर साकारणार आहे . सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहील हे नक्की. हिरकणी च्या मोशन पोस्टर ला अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा या पोस्टर लाँच वेळी उपस्थित होते. चतु:श्रृंगी मंदिरात प्रमुख भूमिकेचं पोस्टर लाँच करुन ‘हिरकणी’ टीमने देवीचे दर्शन घेतले.

 

Hirkani 03

 

‘हिरकणी’ चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.