Siddharth Jadhav’s upcoming movie Jaago Mohan Pyare

मराठी रंगभूमीला खूप चांगले दिवस आले असून सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं रसिकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांनी प्रेक्षणकचे मनोरंजन करून त्यांची मनं जिंकली आहेत. सध्या रंगभूमीवर येणाऱ्या मराठी नाटकांची संख्या देखील वाढत चाली आहे. हल्ली नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहता नाटकांवर आधारित मराठी चित्रपटही बनवले जात आहेत. याचंच एक उद्धरण म्हणजे ‘नटसम्राट’ हा चित्रपट , नटसम्राट या गाजलेल्या नाट्यकलाकृतीवर आधारित हा चित्रपट होता. तसेच लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर ‘खो खो’ हा चित्रपट तयार झाला. तसेच ‘टाइमप्लीज’ हा चित्रपट ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकावर आधारित होता.

 

Jago Mohan Pyare 01

 

या शिवाय ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘गारंबीचा बापू’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’ या विविध नाटकांवरही चित्रपट सादर झाले होते. आता लवकरच अजून एक गाजलेलं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं ‘जागो मोहन प्यारे’ हे नाटक आता चित्रपटाच्या रुपानं प्रेक्षकांसमोर येत आहे. या नाटकामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधवला अभिनेता म्हणून वेगळी ओळख मिळालं.

 

Jago Mohan Pyare 02

 

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव हा सुप्रसिद्ध अभिनेता करत आहे. मूळ नाटकात मोहनची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत आपण अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी याना या चित्रपटात पाहणार आहोत. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.