Siddharth Jadhav’s Diwali Shopping for Family

SiddharthJ Diwali 03

 

दिवाळी म्हणजे खरेदी आली , पण दिवाळीच्या वेळी बाजारात चालणे सुद्धा अश्यक्य होऊन जाते. सेलिब्रिटींना तर कायम याच परिसिथितला सामोरे जावे लागते. जिकडे कुठे ते जातात तिथे त्यांच्या फॅन्स ची गर्दी होते. आपला लाडका अभिनेता सिध्दार्थ जाधव याने त्याची खराडे करण्यासाठी चक्क एक मस्त युक्ती केली. मुंबईत दिवाळी शॉपिंग करण्यासाठी सिध्दार्थ जाधवने चक्क तोंडाला आपला स्कार्फ बांधला आणि ह्या मास्कमुळे तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरून शॉपिंग करू शकला.

SiddharthJ Diwali 01

सध्या अभिनेता सिध्दार्थ जाधव यांचा खूप मोठा फॅन फोल्लोविंग वर्ग आहे . पण असे असले तरी प्रसिध्दीच्या शिखरावर असूनही त्याला सामान्य माणसासारखे आयुष्य जगायला आवडते. यामुळे दिवाळी ही त्यांना सामान्यासारखीच साजरी करणे पसंत पडते. पणत्या असो, कंदील असो, की त्याच्या मुलींच्या कपड्यांची शॉपिंग हे सगळी त्यांनी स्वतः केली. पण सद्य त्यांच्यासाठी पाच मिनिटं चालणेही त्याला मुश्कील झाले आहे. त्यामुळे त्याने तोंडाला मास्क लावून शॉपिंग केली.

 

SiddharthJ Diwali 02

 

रोहित शेट्टीची बहुचर्चित फिल्म ‘सिम्बा’ मध्ये अभिनेता सिध्दार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हैदराबाद येथील रामोजी रावमध्ये चित्रीकरणात सध्या तो व्यस्त आहे. दिवाळीच्या अगोदर कशीबशी त्याला दोन दिवसांची सुट्टी घेत सिध्दार्थने मुंबई गाठून आपल्या चिमुकलींसाठी दिवाळी शॉपिंग केली.