Shivya music launch

‘ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या” शिव्या तुम्ही देता का.. ? हटके नाव हटके कथानक आणि असे बरेच हटके प्रयोग घेऊन दिग्दर्शक साकार राऊत २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे .नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला . चित्रपटाची स्टार कास्ट या कार्यक्रमाला हजर होती.

Shivya Music launch 01
भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.‘शिव्या’ हि गोष्ट प्रत्येक माणसाच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या बोलण्यातुन कधी ना कधी शिव्या येतातच. कायम शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात आसा काही प्रसंग घडतो, की दुसऱ्या दिवसापासून त्याला शिव्या देता येत नाही. त्या नंतर त्या माणसाचं काय होतं या धमाल संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे. ‘शिव्या’ हा चित्रपटा साकार राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. साकार राऊत आणि नीलेश झोपे यांनी चित्रपटाचं लेखन केलं असून सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल्स फिल्म्स, कर्मा फिल्म्स आणि रंगमंच एण्टरटेनमेन्ट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटासाठी ध्वनी साकार राऊत यांनी केला असून नीलेश झोपे, मिहीर करकरे आणि आशय पालेकर हे नवोदित तरुण या चित्रपटाचे निर्माते आहेत. संस्कृती बालगुडे आणि भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच पियुष रानडे देखील या चित्रपटात झळकणार आहेत यासोबतच विद्याधर जोशी, उदय सबनीस, शुभांगी लाटकर हे कलाकार देखील झळकणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात दोन गाणी आहेत. नीलेश लोटणकर यांनी लिहिलेल्या शीर्षक गीताला श्रीरंग उर्हेकर यांनी संगीतबद्ध केलं असून अनिरुद्ध जोशी यांनी हे गाणं गायलं आहे. तर जावेद अली आणि सोनाली दत्ता यांनी एक रोमॅण्टिक गाणं गायलं असून, गीतलेखन दीपक गायकवाड आणि संगीत दिग्दर्शन मनोज टिकारिया यांचं आहे.

चित्रपटाविषयी एका मुलाखतीत सांगताना दिग्दर्शक साकार राऊत म्हणाले कि, ‘आपण बोलताना सहजपणे शिव्या देतो. त्याचा अर्थ काय, आपल्या आजूबाजूला कोण आहे याचाही विचार करत नाही. शिव्या दैनंदिन आयुष्याचाच भाग आहेत. शिव्या ही संकल्पना घेऊन एक वेगळ्या धाटणीचं कथानक मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे.’

Shivya Music launch 02

Page 1 of 8

Shivya Music launch 02

Page 1 of 8

Leave a Reply

Your email address will not be published.