Shirdevi and Nawazuddin Siddiqui on the sets of ‘Chala Hawa Yeu Dya’

  Shridevi on CHYD 03 

 

 

झी मराठीवरील सुपरहिट शो ‘चला हवा येऊ द्या’ हा कायमचा चर्चेचा विषय असतो . सध्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज या मंचावर येताना आपण पाहत आहोत. नुकताच या मंचावर बॉलिवूडची ‘हवा हवाई गर्ल’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवीने थुकरटवाडी गावात आली होती. ‘मॉम’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी श्रीदेवी तसेच त्यांचे पती व या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि या चित्रपटातील त्याचे सहकलाकार नवाझुद्दीन सिद्दीकी ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात श्रीदेवी यांचा खास मराठमोळ्या अवतर प्रेक्षकांना पाह्यला मिळाला.

 

Shridevi on CHYD 02

 

 

आपलय उत्तम नृत्या व अभिनयाने श्रीदेवीने ८० आणि ९० चं दशक गाजवलं होते. आज हि त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे. त्यांचे काही सुप्रसिद्ध चित्रपट ‘सदमा’, ‘चांदनी’, ‘चालबाज’ या मधून त्याने साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांना आजही आठवतात. खाजगी आयुष्यात लग्नानंतर काही काळ त्या अभिनयापासून दूर होत्या. या नंतर ‘इंग्लीश विंग्लीश’ या चित्रपटादव्यारे त्याननी पुन्हा एकदा कमबॅक केला . आता ‘मॉम’ या आगामी चित्रपटातून त्या आपल्यासमोर येत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त श्रीदेवी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आल्या होत्या.

 

Shridevi on CHYD 01

 

 

नेहमीप्रमाणे थुकरटवाडीच्या मंडळीने आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम सादर केला. या वेळी ‘नागिन’ चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय ‘इंग्लीश विंग्लीश’ सारखा ‘मराठी बिराठी’ चा क्लासही या मंचावर भरविण्यात आला ज्यामध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्याने अतिशय धम्माल केली. तसेच पोस्टमन काकाने मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना एक पात्रातून वाचून दाखवल्या ज्यामुळे सर्वजण भावुक झाले.

 

Shridevi on CHYD 04

 

 

प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.