‘Shentimental’ poster launched on occasion of Ashok Saraf’s birthday

 Shentimental 02

अशोक सराफ यांचा जन्म जून ४, इ.स. १९४७ रोजी झाला. त्यांचे नवरी मिळे नवऱ्याला , गंमत जंमत , अशी ही बनवाबनवी , आयत्या घरात घरोबा हे काही प्रमुख चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होत. सकस अभिनय आणि उत्तम संवाद शैलीतील कॉमेडी चे ‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत तोड नाही.

 

मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घरांघरांत पोचला आहे. अशोक सराफ यांच्या वाढदिवसा निमित्त ४ जूनला ​’शेंटिमेंटल’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.

 

हा चित्रपट दिग्दर्शक समीर पाटील दिग्दर्शित करत आहेत. यया आधी त्यांनी ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘पोस्टर गर्ल्स’ यांसारख्या दोन हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अशोक सराफ यांचा फोटो असलेल्या अनोख्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अशोक सराफ यांच्या या आगामी चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘शेंटीमेंटल’ हा समीर पाटील यांचा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक सराफ प्रमुख भूमिका साकारत आहेत.

 

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अशोक सराफ आपल्याला हवालदाराच्या वेषात दिसत आहेत. हवालदाराचा वेष शोक सराफ यांच्यासाठी खरेच खूप खास आहे. याचा कारण म्हणजे १९७५ साली अशोक सराफ यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटतील त्यांची हवालदाराची भूमिका खूप गाजली होती. आता ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटामध्ये सहाय्यक पोलीस उप निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांन समोर झळकणार आहेत. या चित्रपटाततील त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव प्रल्हाद घोडके असे आहे.

 

मागील अनेक वर्षांपासून आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाची घोषणाकरत पोस्टर लाँच द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Shentimental 01

Leave a Reply

Your email address will not be published.