‘Shentimental’ music launch event held at Mumbai

Shentimental Music Launch 01

नुकताच शेंटिमेंटल या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा मुंबई येथे पार पडला. भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो अशी अनोखी पार्श्वभूमीवर या वेळी तयार करण्यात आली होती . ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून पोलिसांमधील माणसाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई. सी. एम. पिक्चर्स हि कंपनी असून बनी डालमिया यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक समीर पाटील आहेत.

 

या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर यांनी आणि संगीतबद्ध केली आहेत मिलिंद जोशी यांनी. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून त्यातील एका गाण्यात दिवस रात्र, वेळ काळ न बघता कार्यरत राहणाऱ्या पोलिसांचा संसार पोलीस चौकीशीच कसा बांधला गेलेला असतो याचे चित्रण करण्यात आले आहे. या गाण्यांना अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान, निहिरा जोशी देशपांडे, पावनी पांडे यांचा आवाज लाभला आहे.

 

Shentimental Music Launch 02

 

विनोदाच्या अचूक टायमिंगद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ उर्फ मामांची पया चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. तसेच उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी यांची महत्वाची भूमिका ‘शेंटिमेंटल’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या डॉ. अर्चना सारडा, डॉ. राजेश सिन्हा, डॉ. राजगोपाल कालानी, रॉनी जॉर्ज, जयवंत वाडकर, मेधा मांजरेकर, सुगंधा लोणीकर,नितीन वैद्य आणि डॉ. उदय निरगुडकर या नऊ कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा महाराष्ट्र राज्याचे डी. जी. एस. आर. पी. एफ. मा. श्री. संदीप बिष्णोई, मा.सौ.किरणताई दिलीपराव वळसे पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते ‘शेंटिमेंटल’ या पुरस्काराने या वेळी गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे संगीत प्रदर्शित करण्यात आले. अतिशय गंभीर विषय हि सहज आणि मनोरंजक पद्धतीने मांडणे हि समीर पाटील यांची खासियत आहे व ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या माध्यमाने समाजातील या महत्वाच्या घटकाची जाणीव ते सगळ्यांना करून देणार आहेत.

 

Shentimental Music Launch 03

 

‘शेंटिमेंटल’ हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.