Shashank M Shende’s upcoming movie ‘Redu’

Redu 02

 

बॉलीवूड मधील सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ चित्रपटातील ‘रेडियो’ गाणं प्रदर्शित झाले व प्रेक्षकांना ते भरपूर आवडले होते. असच ‘रेडियो’ वर आधारित चित्रपट ‘रेडू’ लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे. सत्तरीच्या दशकात रेडियो हेच एकमेव मनोरंजनाचे साधन होते. रेडिओ सोबतच ट्रांझिस्टर हाही तितकाच लोकप्रिय होता. या नंतर झालेल्या तांत्रिक प्रगती मुळे नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येत गेल्या आणि या सगळ्यामध्ये रेडियो कुठेतरी हरवून गेला. रेडिओ वर लागणारी गाणी, न्यूज, कॉमेंटरी वगैरे आता दृकश्राव्य माध्यमांतून दिसू लागले आहेत.

 

दिग्दर्शक सागर वंजारी असा घेऊन येत आहेत रेडू हा चित्रपट.भारतामध्ये असाही काही दुर्गम भाग होता जिथे रेडियो म्हणजे काय हेदेखील माहित नव्हते. अशाच भागातील एका कथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव ‘रेडियो’ चा अपभ्रंश ‘रेडू असेच आहे.सत्तरीच्या दशकातील एका खेड्यातील तातूची ही कथा असून त्याला कधीही न पाहिलेला अन ऐकलेला रेडियो सापडतो. लहान मुलाच्या खेळण्याप्रमाणे तो सतत त्याबरोबर वेळ घालवतो. आणि जीवनाचा अविभाज्य झालेला त्याचा ‘रेडू’ हरवतो आणि त्याची अवस्था दयनीय होते.

 

या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणात निसर्गरम्य वातावरणात झाले आहे. शशांक शेंडे हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. निर्माते नवलकिशोर सारडा यांच्या नवल फिल्म्सने, ब्लिंक मोशन पिक्चर्स प्रा. ली. प्रोडक्शन बरोबर याची निर्मिती केली असून ‘रेडू’ चं दिग्दर्शन केलंय सागर वंजारी यांनी. ‘रेडू’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.