See Photos : Shashank Ketkar married to Priyanka Dhavale

Shashank and Priyanka Marriage 07

 

आपला लाडका अभिनेता ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर नुकताच विवाह बंधनात अडकला. शशांकने ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री हि भूमिका साकारली होती. त्याच्या उत्तम अभिनयामुळे तो महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला. शशांकने साकारलेला ‘श्री’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.आपल्या लाडक्या श्री चे म्हणजे शशांक केतकर व्यवसायाने वकील असलेल्या प्रियांका ढवळेसोबत नुकताच लग्न झाले आहे. याच वर्षी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. लग्नाआधी शशांक आणि प्रियांका हे खूप चांगले मित्र होते. अभिनेता शशांकचा हा दुसरा विवाह आहे.

 

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक आणि प्रियांकाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता .साखरपुडा झाल्यापासून शशांकच्या लग्नाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. रविवार ३ डिसेंबर रोजी पुण्यात शशांकचा विवाहसोहळा पारंपारीक विवाह पद्धतीने पार पडला. या लग्नसोहळ्याला शशांक आणि प्रियांकाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. नववधू प्रियांकाचा अंदाज यावेळी कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळाला. सोशल मीडियावर शशांक आणि प्रियांका वर रसिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

अभिनेता शशांकचा पहिले विवाह अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत झाले होते.आपण तिला ‘होणार सून ह्या या घरची’ मालिकेत श्री ची पत्नी जान्हवी या भूमिकेत पहिली होतं.श्री आणि जान्हवी हि जोडी त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्री यांच्यात प्रेम फुलले होते व त्यांनी विवाह केला.या नंतर केवळ एका वर्षात काही कारणाने ते विभक्त झाले.

 

Shashank and Priyanka Marriage 06

Shashank and Priyanka Marriage 05

Shashank and Priyanka Marriage 04

Shashank and Priyanka Marriage 02