See Photos: ‘Deva’ celebrates children’s day in Nilambari

लहानपण हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुखकारी काळ असतो. लहान निरागस मुलांसोबत वेळ घालवणं सगळ्यांचं आवडतं. अभिनेता अंकुश चौधरीने गोंडस मुलांसोबत साजरा केला ‘चिल्ड्रन्स डे’. १४ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. अंकुश चौधरीने निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये गरजू आणि अनाथ मुलांबरोबर बालदिनाचा आनंद लुटला.

‘देवा’ या इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स ची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने, या मुलांना अंकुशसोबत काहीवेळ घालवण्याची हि मस्त संधी मिळाली. बच्चेकंपनीने निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफर अभिनेता अंकुश सोबत केली . देवा या चित्रपटात लोकांना मदत करणा-या एका तरुणाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे अंकुश चौधरी ख-या आयुष्यातदेखील ‘देवा’ या पात्रासारखाच आहे. त्याने स्वप्रेरणेने आजवर अनेकांना मदत केली आहे , सामाजिक कार्यात तो नेहमी पुढाकार घेतो. या मुळे त्याच्यासाठी हा बालदिन खूप खास होता . त्याने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी केल्या, त्यांना खाऊ आणि भेटवस्तू दिल्या.

देवा चित्रपटाच्या टीम ने हा आगळावेगळा उपक्रम केला . काही दिवसांपासून याच चित्रपटाच्या प्रमोशसाठी महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम.मध्ये या चित्रपटाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, या भन्नाट कल्पनेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ पोहोचला असा म्हणायला हरकत नाही. ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे चित्रपटाच्या प्रोमोशन करण्याची हि पहिलीच वेळ आहे. देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली नलप्पा यांचे असून येत्या १ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अंकुशसोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची या चित्रपटात प्रमुख भूमिका यात आहे.

 

Deva Childrens day 01

Deva Childrens day 02

Deva Childrens day 03

Deva Childrens day 04

Deva Childrens day 05